-
गीतामृत २ हे पुस्तक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा उर्वरित श्लोकांचा अमूल्य साठा आहे. या पुस्तकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संक्षिप्त रूपात गीतेच्या सर्व विषयांचे ज्ञान प्रदान करीत आहेत. निष्काम कर्मयोग, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे, वेदांची अलंकारिक भाषा, एकाग्र बुद्धीचे लाभ, प्रकृतीचे तीन गुण, भक्तिमय सेवेद्वारे भगवद्धाम प्राप्ती अशा अनेक विषयांवर उदाहरणांद्वारे चर्चा या पुस्तकात केलेली आहे. अर्जुन समाधिस्थ व्यक्तीची लक्षणे विचारतो त्यावेळी भगवंतांनी दिलेले उत्तर आपल्यासाठी एक परिक्षेचे कार्य करू शकते. स्थिर चित्त होण्यासाठी भगवंतांनी या पुस्तकात सांगितलेले उपाय जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपण गीतेत सांगितलेला परम आनंद निश्चितच प्राप्त करू शकू. प्रबळ मनाला नियंत्रित करण्याचा उपाय देखील भगवंत गीतेच्या या भागात सांगतात. पतनाची शृंखला आणि त्यापासून रक्षण करण्याचा उपाय सांगून भगवंत दुसऱ्या अध्यायात सुख प्राप्त करण्याच्या मार्गाचे वर्णन करीत आहेत. आध्यात्मिक जीवनात स्थिर राहण्यासाठी भगवंत सागराचे उदाहरण या पुस्तकात देत आहे. गीतेच्या वाचकासाठी हा अनमोल खजिना नक्कीच भरभरून समृद्धी प्रदान करेन. -
शुभ विलास लिखित 'रामायण : खेळ जीवनसंचिताचा’ या मालिकेतील 'विशाल ध्येय तरच विजय' हे सहावे पुस्तक आहे. या पुस्तकात वाल्मीकी रामायणातील युद्धकांडाचा आशय आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केला आहे. सीतेच्या सुटकेसाठी प्रभू रामांनी केलेल्या प्रयत्नांची आणि त्या महान ध्येयपूर्तीत त्यांना मदत करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांच्या योगदानाची प्रेरणादायी कथा या पुस्तकात उलगडते. राम, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, विभीषण यांसारख्या पात्रांच्या धैर्य, निष्ठा, नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून मोठे ध्येय साध्य करण्याची प्रेरणा वाचकांना या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि ध्येयप्राप्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन करण्याबरोबरच, आपल्या मर्यादांना पार करून स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रगतिशील दृष्टिकोन प्रदान करते. ठळक वैशिष्ट्ये 1. सामूहिक प्रयत्न, नेतृत्व आणि सहकार्य यांचे महत्त्व स्पष्ट करणारे पुस्तक. 2. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास जागृत करणारे पुस्तक. 3. विजयामागील सामूहिक प्रयत्नांची शक्ती प्रभावीपणे दाखवणारी कथा. 4. तरुण पिढीला ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा देणारे पुस्तक. -
यमुना नदीचे जीवनस्वरूप असलेले भगवान श्रीकृष्ण तिच्या पाण्यात उड्यामारून, खेळ खेळून खूप आनंद अनुभवतात. (यमुना जीवन केली परायण) ज्याप्रमाणे चकोर पक्षी केवळ चंद्रप्रकाशाकडेच पाहात राहतो, त्याचप्रमाणे चकोरासारख्या गोपीही फक्त चंद्रासारख्या श्रीकृष्णचंद्राकडे पाहात राहतात (मानस-चंद्र-चकोर) श्रील भक्तिविनोद ठाकूर विनंती करतात, 'आता भगवंतांच्या या वेगवेगळ्या नामांचा जप कर! हे माझ्या प्रिय मना! कृपया माझ्या शब्दांचे गांभीर्याने पालन कर! नाकारू नको! श्रीकृष्णांच्या अमृतरूपी पवित्र नामांचा अखंड जप करीत राहा!' (श्रील प्रभुपादांच्या 'विभावरी शेष' च्या तात्पर्यावर आधारित) -
रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. चांगल्या खेळात क्षणोक्षणी आव्हाने आणि अनिश्चितता असते. हे महाकाव्य आपल्या जीवनातील आव्हानांना पैलण्यासाठी अनेक महत्त्वाची साधने प्रस्तुत करते. जीवनातील सर्वांत कठीण प्रसंगांशी धैर्याने दोन हात करणारा धाडसी योद्धा बनविणारे धडे या पुस्तकात आहेत. जीवनाच्या या खेळात आपण सर्व जण पुढील तीनपैकी एका श्रेणीत मोडतो. * सकारात्मक साहाय्यक - विश्वामित्रांसारखे ऋषी समाजात सकारात्मक दृष्टीने योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतात. * नकारात्मक विध्वंसक - मारीच आणि सुबाहू यांसारखे राक्षसी प्रवृत्तीचे लोक नकारात्मक विनाशाचे मायाजाल पसरवतात. * संरक्षक मध्यस्थ - राम आणि लक्ष्मण यांसारखे लोक सकारात्मक गोष्टी प्रदूषित होऊ नयेत यासाठी अथक परिश्रम घेत असतात. तर या खेळामध्ये तुम्हाला कोणती भूमिका पार पाडायची आहे? सूर्यवंशी राजपुत्राचा उदय हे रामायण खेळ जीवनसंचिताचा या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक आहे. वाल्मीकी रचित महाकाव्याच्या बालकांडावर आधारित आधुनिक कथन असलेले हे पुस्तक, जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडवते; तसेच बुद्धीला चालना देणाऱ्या शिकवणींना प्रस्तुत करते. अभ्यासू लेखक शुभ विलास या पुस्तकात आजच्या आधुनिक जगाच्या अनुषंगाने अमर जीवनमूल्ये स्पष्ट करत आहेत. -
गीतामृत २ भाग १ हे पुस्तक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे. यात प्रत्येक श्लोकाचा गूढ अर्थ हा प्रवाहासारखा प्रस्तुत केला आहे. प्रत्येक श्लोक कसा एकमेकांमध्ये गुंफलेला आहे हे आपल्याला या पुस्तकातून समजते. प्रत्येक श्लोक समजावू सांगताना प्रस्तु केलेली अनेक उदाहरणे या गुंफलेल्या हाराचे सौंदर्य आणखीनच वाढवते. ही उदाहरणे त्या श्लोकाचा अर्थ रंजकरीतीने तर सांगतातच; पण आपल्या दैनंदिन जीवनात त्या श्लोकाला कसे आत्मसात करावे याचेही प्रबोधन करतात. यामुळे भगवंतांच्या मुखातून उद्गम पावलेली ही वचने अधिकच रोचक आणि निमग्न करणारी ठरतात. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आत्मा आणि शरीराची गुणधर्मे अर्जुनाला समजावून सांगतात त्यावेळी बाह्यदृष्टीने एकच गोष्ट वारंवार सांगितल्यासारखे वाटते. तथापि, जेव्हा आपण खोलवर जाऊन दोन श्लोकांमधील गूढ अर्थ बघतो, तेव्हा आपल्यापुढे त्याच गोष्टींचा अर्थ विलक्षण पद्धतीने उलगडतो आणि हा अनुभव अद्भुत प्रेरणादायी ठरतो. जेवढे अधिक आपण या पुस्तकाचे वाचन करू तेवढा अधिक आपल्याला गीतेचा गूढ अर्थ समजेल. भगवद्गीतेचे अमृत ज्ञान गीतामृत २ भाग १ या पुस्तकाद्वारे प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. -
डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञान फारच व्यापक झालं आहे. हे पुस्तक वाचकांना एकाग्रता व डिजिटल जीवनामध्ये स्वनियंत्रण मिळवण्यासाठी दिशा देईल. - आर्थी सुब्रमनियम टाटा सन्सचे समूह प्रमुख डिजिटल ऑफिसर. 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक आपल्याला अंतरंगाच्या प्रवासाला घेऊन जाते. आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजायला मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती हा अर्थ अंतरंगातून जाणून घेते तेव्हाच ती बाह्य जगामध्ये परिवर्तन आणू शकते. - आदित्य नटराज, पिरामल फाऊंडेशनचे सीईओ - 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक फक्त आपल्याला मानसिक स्वास्थाविषयी प्रशिक्षितच करत नाही तर त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्यावर एकाग्रता करण्यासाठी प्रेरितही करते. - संगीता रेड्डी, अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या सह व्यवस्थापकीय संचालक - 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं पुस्तक आहे. अतिशय प्रभावी अशा ४५ कथांच्या माध्यमातून वाचकांना त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील असे मानवी गुण यामधून व्यक्त केले आहेत. याच मालिकेतील पहिलं पुस्तक 'आर्ट ऑफ रेझिलियन्स' म्हणजेच लवचीकता. या पुस्तकाने कोव्हीड १९ च्या काळात निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये लोकांना लवचीकतेच्या आधारे मार्ग काढण्यासाठी प्रेरित केलं. 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तकही एकाग्रतेच्या माध्यमातून मनाला एक नवी उभारी देते. हे पुस्तक लोकांना त्यांच्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यास व आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल.