भारतीय परंपरेत किंबहुना समाजमाणसात अनन्यसाधारण महत्त्व असलेला चितरुण असा महानायक म्हणजे हनुमान. ‘अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे’ इतकी प्रचंड क्षमता ज्याच्या ठायी एकवटली आहे, त्या हनुमानाविषयी परिचित-अपरिचित अशा अनेक गोष्टी सांगणारे हे पुस्तक आहे. हनुमानाच्या बालरूपापासून महानायकाच्या प्रवासादरम्यानची अनेक गुणवैशिष्ट्ये यामधून वाचकांसमोर येतात ती वाचकांना निश्चितच प्रेरणा देणारी आहेत. हनुमानाच्या गोष्टींची आधुनिक शैलीमध्ये नावीन्यपूर्ण रीतीने मांडणी लेखकाने केली आहे. भारतीय पुराणांमधून आणि लोकथांमधून हजारो वर्षं अस्तित्वात असलेल्या हनुमानाच्या कथा एकत्र आणण्याचा अभिनव प्रयत्न यामध्ये केला आहे. त्याला भारतातील वैशिष्ट्यपूर्ण हनुमान मंदिरांच्या माहितीची आणि हनुमानासंदर्भातील प्रार्थनांचीही जोड देण्यात आली आहे; हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होय.